माझे लेख 

04.03.23 11:36 AM

डेेट म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
                         अरविंद परांजपे



आपल्या देशातील बहुसंय गुंतवणूकदारांची पसंती ही सुरक्षित गुंतवणूक प्रकाराला असते. त्यामुळेच बँकेतील किंवा पोस्टातील ठेवींना प्राधान्य मिळते याचे आश्चर्य वाटत नाही. आयुर्विमा पॉलिसी घेतानासुद्धा पारंपरिक अशा सुरक्षित प्रकारांच्या(एंडोमेंट/मनीबॅक) पॉलिसीला प्राधान्य मिळते. त्यामुळे एकूण बचतीच्या 80 टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक ठेवी, रिझर्व्ह  बँक बाँड्स, विमा अशा गुंतवणूक प्रकारात होते.पण या पलीकडे जाऊन म्युच्युअल फंडाच्या माघ्यमातून मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळवणे शक्य आहे. त्याकरता म्युच्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणजे फक्त इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक असा अनेकांचा असलेला गैरसमज दूर करायला हवा. इव्किटी अ‍ॅसेट प्रकाराशिवाय डेट (निश्चित उत्पन्न योजना), सोने-चांदी आणि स्थावर मालमत्तेचे रिट्स या अ‍ॅसेट वर्गातही म्युच्युअल फंडातून गुंतवणूक होत असल्याने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एकात्मिक साधन बनले आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांची आर्थिक उद्दिष्टे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. पण त्याकरता डेट फंडांची पुरेशी माहिती घेणे जरुरीचे आहे.जरी या प्रकाराला निश्चित उत्पन्न (फिक्स्ड इन्कम) देणारा अ‍ॅसेट प्रकार म्हणले असले तरीही डेट योजनेवरच्या परताव्याची हमी नसते. इतकेच काय मुद्दलही रोखेबाजाराच्या चढ-उतारानुसार कमी-जास्त होत असते. त्यामुळे पूर्ण सुरक्षा हवी असेल तर सरकारी बँकेची मुदतठेव किंवा रिझ्रर्व बँकेचे रोखे - म्हणजे ज्याला भारत सरकारची हमी आहे यांना पर्याय नाही. परंतु थोडी जोखीम घेऊन डेट फंडातून ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. विशेषत: जे प्राप्तिकरदाते आहेत त्यांना डेटफंडातून ठेवींपेक्षा जास्त करोत्तर परतावा मिळू शकतो. पण हे कसे करायचे ते गुंतवणुकदारांनी समजून घेतले पाहिजे. त्याकरता महागाई वाढ आणि व्याजदर यांवर लक्ष ठेवावे लागेल.
परदेशातील अभूतपूर्व महागाईवाढ
गेली दोन वर्षे अर्थजगतात खळबळ माजवणारा विषय म्हणजे सर्वच देशांमध्ये वाढत असलेली महागाई. विशेषत: रशियाच्या युक‘ेनवरील आक‘मणाने कच्च्या तेलाचे आणि धान्याचे दरात लक्षणीय वाढ झाली. इंग्लंड/अमेरिकेत  तर गेल्या 4 दशकातल्या उच्चांकी महागाईने आर्थिक संकट उभे केले आहे. या सर्व देशांच्या तुलनेत भारतातील आर्थिक विकासाचा वेग सर्वात जास्त आहे. तसेच येथील महागाईचा दरही नियंत्रणात राहू शकेल अशी परिस्थिती आहे. किरकोळ महागाईवाढीचा दर  4% ते 6%  या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट हे आपल्या रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा महत्त्वाचा भाग  आहे. परंतु विकास दरावर परिणाम होऊ नये म्हणून 2021 पर्यंत महागाईदरवाढीकडे थोडेसे दुर्लक्ष करून रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने व्याजदर वाढवले नव्हते. त्याबरोबरीने कोविड काळात घसरलेला विकास दर वाढण्याकरता सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँकांनी पतपुरवठा वाढवून व्याजदरही कमी केले होते. परंतु  2020 ते 2022 या काळात 4% असलेला रेपोरेट मे 2022 मध्ये 4.4% तर सप्टेंबर 2022 मध्ये 5.9% केला आहे. पुढील 6 महिन्यात तो आणखीन एक टक्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 10 वर्षे मुदतीचे सरकारी रो‘यावरचा परतावा (यिल्ड) 6% वरून 7.5% वर पोचला होता. अमेरिकेत तर 1%पेक्षा कमी असलेले व्याजदर आता 4% पेक्षा वर गेले आहेत आणि तेही अजून थोडे वाढण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या व्याजदराचा आणि त्यात होऊ शकणार्‍या संभाव्य वाढीचा फायदा डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून घेता येऊ शकेल असे तज्ञांचे मत आहे.
डेट पेपर
म्युच्युअल फंडाच्या डेट फंड योजना या डेट आणि मनी मार्केट मध्ये अशा डेट पेपर्समध्ये गुंतवणूक करतात. यात सरकारी आणि खाजगी कंपन्यांचे रोखे, कमर्शिअल पेपर्स (सीपी), बँक सीडी अशा निश्चित उत्पन्न देणार्‍या साधनांचा स्मावेश असतो. म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्ता म्हणजे ए.यु.एम.(अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंट)  पैकी 60% पेक्षा जास्त ए.यु.एम. डेट योजना प्रकारांमध्ये आहे. एक व्यक्ती दुसर्‍याकडून कर्ज घेते तेंव्हा कर्जाची रक्कम, पातफेडीची मुदत, हप्ते, व्याजदर, व्याजदर आकारणीची पद्धत आणि तारण वगैरे अन्य अटी असलेला करार केला जातो. सामान्यपणे याला डेट पेपर म्हणले जाते. या पेपर्सची रोखेबाजारात खरेदी-विक‘ी चालू असते. शेअर्सचे व्यवहार जसे बीएसई आणि एनएसई वर होतात त्याप्रमाणे त्यांच्या डेट मार्केट विभागात डेट पेपर्सची म्हणजे रो‘यांची नोंद झालेली असते. शेअर्सप्रमाणेच त्यांचीही चालू बाजारभावाला (रियल टाईम) खरेदी-विक‘ी होत असते. या घाऊक बाजारांमध्ये (होलसेल मार्केट मध्ये) संस्थात्मक गुंतवकदार भाग घेतात. याकरता मोठी रक्कम आवश्यक असल्याने हा बाजार किरकोळ (रिटेल) गुंतवणुकदारांकरता नाही. त्यांच्या करता डेट म्युच्युअल फंड योजना आहेत. रो‘यांच्या दैनंदिन बाजार मूल्यानुसार म्युच्युअल फंड योजनांचे मूल्यांकन होते. त्यामुळे या योजना निश्चित उत्पन्न वर्गात जरी असल्या तरी परताव्याची हमी नसते. योजनेतील रो‘यांच्या बाजारभावानुसार डेट फंड योजनांच्या युनिट्सचे मूल्य म्हणजे एन. ए. व्ही. ठरते. त्यामुळे त्यात वध-़घट होत असते.

डेट फंडावरची जोखीम
म्युच्युअल फंडात इव्किटी फंडाबरोबरीने डेट फंड मॅनेजर्सही असतात. बाजारातील रोखे घेण्याबरोबरीने, उद्योगांना लागणारे कर्जही म्युच्युअल फंडाकडून दिले जाते. कर्ज घेणार्‍यांची बँकांकडून जशी छाननी होते तशाच प्रकारची प्रकि‘या डेट फंड व्यवस्थापक अवलंबतात आणि त्याशिवाय तारण म्हणून प्रवर्तकाचे शेअर्स आणि अन्य मालमत्ताही घेतली जाते. डेट योजनेवर 2 प्रकारच्या जोखमीच्या बाबी असतात
1. क‘ेडिट रिस्क - मुद्दलाची जोखीम - म्हणजे कर्जाच्या अटीनुसार मुद्दल किंवा त्यावरील व्याज न मिळण्याची जोखीम. योजनेत किती जोखीम किती आहे याचा अंदाज त्यातील रो‘यांच्या रेटिंग़वरून येऊ शकतो. ’एएए’ (ट्रिपल ए) असे मानांकन असलेले रोखे असणे म्हणजे उच्चप्रतीची सुरक्षितता आहे असे समजले जाते. त्यानंतर तुलनेने कमी सुरक्षा दर्शवणारी ’एए’, ’ए’, ’बीबी’, बीबी’ ’बी’ अशी मानांकने असतात. ’डी’ मानांकन असणे (डीेफॉल्ट) म्हणजे व्याज/मुद्दल परतफेड करू शकत नाही अशी स्थिती.
2. इंटरेस्ट रेट रिस्क- व्याजदर जोखीम - बाजारातील व्याजदरांमधल्या चढ-उतारांमुळे रो‘यांच्या बाजार मूल्यात फरक पडतो. जेंव्हा बाजारातले व्याजदर वाढतात तेंव्हा रो‘यांचे बाजार मूल्य कमी होते. म्हणजे गुंतवणुकदाराला तोटा होतो. या उलट जेंव्हा बाजारातले व्याजदर कमी होतात तेंव्हा रो‘यांचे बाजार मूल्य वाढते, आणि गुंतवणुकदाराला फायदा होतो. आपल्याला वाटते याच्या उलट हे होते. व्याजदरातील बदलांचा परिणाम रो‘याची मुदत जेवढी जास्त असते तेवढा त्यावर जास्त होतो. अर्थात आपल्याला जे वाटते त्याच्या अगदी विरुद्ध हे होत असते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. 10% वार्षिक व्याजदर असलेल्या एका रो‘याची बाजारातील किंमत सध्या 100 रुपये असेल आणि जर बाजारातील व्याजदर 11% झाला तर या रो‘याची किंमत थोडीशी कमी होते. बाजारातील व्याजदर 11% झाल्या’ुळे त्यापेक्षा कमी व्याजदराचा (म्हणजे 10% चा) रोखा खरेदी करणे हे नुकसानीचे होईल, कारण त्यावर 1% व्याज कमी मिळेल. त्याऐवजी बाजारातून नवीन 11% व्याजदराचा रोखा घेणेच योग्य होईल. या रो‘याची राहिलेली मुदत जेवढी जास्त तेवढा त्यावर बदलणार्‍या व्याजदराचा जास्त परिणाम होईल.  व्याजदर वाढले की जुन्या रो‘याची बाजारातली किंमत कमी होऊन गुंतवणूकमूल्य घटते. याउलट बाजारातील व्याजदर कमी झाले तर रो‘यांची बाजारातील किंमत वाढते आणि गुंतवणूकमूल्य वाढते. याला ‘मार्क टु मार्केट’ असे म्हणतात. म्हणजे रो‘याची किंमत बाजारभावाला आणणे (- किंवा +) ज्यामुळे रोखेधारकाचे गुंतवणूकमूल्य कमी किंवा जास्त होऊ शकते.
डेट फंडाचे प्रकार
सेबीने डेट फंडाच्या योजनांची वर्गवारी करताना16 उपप्रकार  निश्चित केले आहेत. ही वर्गवारी साधारणपणे रो‘यांच्या मुदतीनुसार केलेली आहे.
 
डेट योजनेमुळे पोर्टफोलिओला स्थिरता येते आणि नियमित उत्पन्नही मिळू शकते. गुंतवणुकदाराने आपल्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशननुसार इव्किटी, डेट आणि बॅलंस्ड प्रकारात गुंतवणूक करावी.  बॅकेवरच्या ठेवींपेक्षा डेट फंडांवर प्राप्तिकराची सवलत असल्याने, अधिक करोत्तर परतावा मिळू शकतो. त्यामुळे जे 30% दराने प्राप्तिकर भरतात त्यांना डेट योजनेतील गुंतवणूक अधिक लाभदायी असते.
डेट योजनांमध्ये साधारण पणे कालानुसार अशी विभागणी केली जाते. 1)अल्प काळासाठी- 1 वर्षापेक्षा कमी, 2) मध्यम काळासाठी (ंमिडियम टर्म- 3 वर्षे) आणि 3)दीर्घकाळासाठी (5 वर्षापेक्षा अधिक)
अल्प काळासाठी लो ड्युरेशन, अल्ट्रा शॉर्ट-टर्म आणि शॉर्ट टर्म योजनांचा विचार करता  येईल. तर 3 ते 5 वर्षे कलावधीसाठी कॉर्पोरेट बाँड फंड, इन्कम फंड, क‘ेडिट रिस्क फंड. बँकिंग आणि पीएसयु डेट फंड यांचा विचार करता येईल.
सेबीच्या म्युच्युअल फंड योजना विभागणीनुसार कमी जोखमीचे कॉर्पोरेट बाँड किंवा बँकिंग आणि पीएसयु योजना ंमध्ये किमान 80 % फक्त ’ए ए ए’ मानांकन असलेले रोखेच घेता येत असल्याने या योजना तुलनेने अधिक सुरक्षित असतात.
डेट योजनेचे मागील काळातील परतावे बघताना त्याची सांगड त्यावेळच्या बाजारातील व्याजदरांशी घालून मग निर्णय घ्यावेत. रिपो दरात जेंव्हा कपात होईल त्यानंतर रो‘यांचे मूल्य वाढू शकेल आणि त्यामुळे होणार्‍या कॅपिटल गेनमुळे योजनांवरील परतावा वाढू शकतो. पण गेल्या एका वर्षात व्याजदर वाढल्यामुळे डेट योजनांवरचा परतावा त्यातील रो‘यांवरच्या व्याजदरापेक्षाही कमी झाला आहे. हीच ती इंटरेस्ट रिस्क होय. उदाहरणादाखल: आयसीआयसीआय प्रु मिडियम टर्म या योजनेतील रो‘यांवरच्या व्याजदरांवरून काढलेले वायटीएम जरी 8% असले तरी त्यावरचा गेल्या वर्षाचा परतावा 3.7%च होता. या योजनेची अ‍ॅव्हरेज मॅच्युरिटी 4वर्षे आहे. त्यामुळे पुढील 4 वर्षे मुदतीकरता या योजनेवर (वायटीएम 8% वजा योजनेचा खर्च -1.4%)एवढ्या परताव्याची अपेक्षा ठेवता येईल. सध्या चालू असलेलीव्याज दरातली वाढ कधी पूर्ण होईल आणि ते कधी कमी व्हायला सुरवात होईल हे पुढे होणार्‍या महागाईदराच्या वाढीवर अवलंबून राहील.
महागाई दरातली वाढ  ही डेट फंडातली गुंतवणुकीची संधी समजता येईल. यातली जोखीम लक्षात घेऊन पुढील काळात  भारतातील व्याजदर कमी होण्याची शक्यता विचारात घेऊन चांगल्या डेट योजनांमध्ये  गुंतवणूक करून आपला करोत्तर जोखीम-सापेक्ष परतावा वाढवता येईल.
डेट योजनांचे पेपर्स कुठल्या रेटिंग़चे आहेत ते बघून मगच त्यात रक्कम गुंतवायला पाहिजे. म्हणजे जसा इक्विटी योजनांचा पोर्टफोलिओप्रमाणे डेट योजनांचाही बघायला पाहिजे व त्यात अअ पेक्षा कमी रेटिंग असलेले पेपर्स नाहीत ना हे बघायला पाहिजे. फ्लोटिंग रेट फंड, कॅश फंड, लिक्विड फंड अशा प्रकारच्या योजनांमधील रोखे व साधनांची मुदत कमी असते. त्यामुळे या योजनांच्या परताव्यात चंचलता कमी असते. डेट फंड मॅनेजरला गुंतवणूक करताना सर्व प्रकारच्या जोखमीच्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते. आणि अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागतो. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात राहून कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे याची नियमित पाहणी करावी लागते.
          बंद योजना (क्लोज एंडेड)
एफ.एम.पी. (फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन - निश्चित मुदत योजना) : मुदत ठेवींप्रमाणे एका ठरावीक कालावधीसाठी फिक्स्ड मॅच्युलिटी प्लान या प्रकारच्या योजना असतात. 30 दिवस ते पाच वर्षे एवढ्या काळासाठी यात रक्कम गुंतवता येते. योजनेच्या कालावधीएवढ्या कालावधीचे पेपर्स यात घेतले जात असल्याने या योजनांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेला इंटरेस्ट रिस्क नसते. रो‘यांच्या पूर्णमुदतीनंतर पैसे काढले जात असल्याने  बाजारातील बदलत्या व्याजदरांचा परिणाम होत नाही. यात क‘ेडिट रिस्क मात्र असते. कारण  दिलेले कर्ज बुडीत खाते व्हायची शक्यता असते. पण चांगला पतदर्जा (रेटिंग) असलेली साधने निवडून असा धोका कमी केला जातो. याशिवाय दुसरा फायदा म्हणजे बँक मुदत ठेवींपेक्षा कमी प्राप्तिकर दराचा लाभ (इंडेक्सेशन) ज्यामुळे ठेवींपेक्षा जास्त करोत्तर परतावा मिळू शकतो. जर 36 महिन्यांपेक्षा अधिक मुदत असेल तर इंडेक्सेशनमुळे दीर्घकालीन भांडवली कराचा फायदा मिळतो. सेबीच्या नियमानुसार याचा अंदाजित परतावा आधी जाहीर करता येत नाही.
योजनेचा कालावधी आणि सापेक्ष जोखीम
गुंतवणुकीच्या कालावधीच्या निकषावर केलेले या सर्व योजनांचे चित्रात्मक विवरण पुढे दिले आहे. यात सर्वात कमी कालावधीसाठी आणि कमी जोखीम असलेल्या लिक्विड फंडापासून सुरुवात करून, सर्वात वरती जास्त कालावधीची अपेक्षा असणारे आणि जास्त जोखीम असणारे डेट फंड प्रकार दाखवले आहेत. गिल्ट फंड सुरक्षित असतात पण व्याजदराची जोखीम असते.
 













अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन आणि पोर्टफोलिओ
                                                                                                                                                                                                     अरविंद परांजपे

जे नियोजन करण्यात अपयशी ठरतात ते जणु अपयशाचेच नियोजन करतात अशा अर्थाची एक इंग‘जीत म्हण आहे. बहुसं‘य गुंतवणूक करणारे या वर्गात असतात असे दिसून आले आहे. कारण विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने गुंतवणूक करायची असते याची त्यांना माहिती नसते. त्यामुळे कोणीतरी सांगितले की कुठली तरी म्युच्युअल फंडची योजना किंवा शेअर्स घेण्याकडे कल असतो. प्रत्येकाने आपला गृहपाठ केला पाहिजे आणि आपल्या अपेक्षा आणि जोखीम क्षमता किती आहे हे ठरवले पाहिजे. हे जर केले नाही तर इतर लोक काय सांगतात त्यावर फारसा विचार न करता अमलात आणतात. अशी गोष्ट ही सांगणार्‍याला फायद्याची असल्याने आपल्यालाही असेलच असा विचार त्यामागे असतो. जेंव्हा शेअर बाजार जसा हेलकावतो तसे हे गुंतवणुकदारही अस्थिर होतात असे दिसून येते. आणि बाजार वर जायला लागला की खरेदी आणि खाली येऊ लागला की विक‘ी असे चुकीचे धोरण स्वीकारतात. त्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्याकरता धोरण आखून पावले कशी टाकली पाहिजे हे सर्वच गुंतवणुकदारांनी समजून घेतलं पाहिजे. देशात अथवा विदेशात कितीही अनिश्चित परिस्थिती असली तरी जर आपली विचारांची दिशा योग्य असेल तर संकटातही मार्ग काढता येतो. पण जर काही ठरवलेच नसेल तर मात्र कठिण परिस्थिती येऊ शकते. अर्थनियोजनातील सुरवातीची महत्त्वाची पायरी असते ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ची. म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करायला वेगवेगळे गुंतवणूक पर्याय कसे निवडायचे ते निश्चित करण्याची पद्धत. अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करून गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकाराची निवड करावी आणि कोणत्या प्रकारात किती पैसे गुंतवावेत हे ठरवले जाते. गुंतवणुकीचे यशापयश ज्यावर अवलंबून असते तो सर्वात महत्त्वाचा घटक.  आणि स्थिर परतावा मिळण्याकरता सर्वात महत्त्वाचे असते ते तुमचे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन. त्यामुळेच अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनची पायरी  गाळली तर दिशाहीन वाटचाल होईल.

गुंतवणूक प्रकारांची निवड
मंडईमध्ये फक्त कांदे किंवा बटाटे अशी एकच भाजी विकणारे जसे असतात तसे अनेक भाज्या-फळे विकणारेही असतात. जे एकच भाजी विकतात त्यांची जोखीम सर्वात जास्त असते कारण जर काही कारणाने त्यांची भाजी विकली गेली नाही तर प्रचंड नुकसान होते आणि ते त्यांना भरून काढण्यासाठी काहीच आधार नसतो. या उलट विक‘ीकरता अनेक प्रकार म्हणजे विविध फळे-भाज्या यांचा ’पोर्टफोलिओ’ असेल तर जरी खूप फायदा होत नाही पण जोखीम खूप कमी होते आणि मग योग्य फायदा मिळवण्याची अपेक्षा ठेवता येते. अगदी हेच तत्त्व गुंतवणुकीच्या बाबतीत आहे. विविध अ‍ॅसेट प्रकार निवडून तुम्ही त्यांचा एक पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि त्या संपूर्ण पोर्टफोलिओकडे लक्ष द्यायचे आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे, कालावधी, जोखीमक्षमता आणि परताव्याची अपेक्षा या सर्वांचा विचार करून अ‍ॅसेट प्रकारांची निवड काळजीपूर्वक करायला पाहिजे.  जोखीमक्षमता आणि परताव्याची अपेक्षा या सर्वांचा विचार करून अ‍ॅसेट प्रकारांची निवड काळजीपूर्वक करायला पाहिजे.  

नातेसंबंध नसलेल्या विविधतेचे महत्त्व
पोर्टफोलिओचा मु‘य फायदा हा की एखाद्या प्रकारात/योजनेत जरी नुकसान झाले तरी इतर प्रकार त्याची भरपाई करू शकतात. विविधतेचे तत्त्व पाळून पोर्टफोलिओ बनवायचा असतो. म्हणजे पोर्टफोलिओमधे जे अ‍ॅॅसेट प्रकार असतील त्यांच्यात (परतावा आणि जोखीम यात) कमीतकमी नाते म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन असणे.  म्हणजे त्यांचा परतावा आणि जोखीम ही वेगवेगळ्या घटकाांवर अवलंबून असला पाहिजे. प्रत्यक्षात असे होणे कठिण असते. म्हणजे सोने आणि इव्किटी हे प्रकार असतील तर जेंव्हा इव्किटी प्रकार पडेल तेंव्हा सोने वर गेले पाहिजे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण पोर्टफोलिओच्या एकत्रित परताव्याचा विचार करायचा असतो. म्हणून सर्वच गुंतवणूक प्रकार एका वेळी फायद्यात नसले तरी चालतात. किंबहुना ते तसे नसणेच अपेक्षित असते. अ‍ॅसेट प्रकारातील विविधते’ुळे अनिश्चित बाजारात पूर्ण पोर्टफोलिओ’धून अपेक्षित परतावा मिळू शकतो. अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनमुळे गुंतवणूक प्रकारांची विविधता वाढते. म्हणजेच ‘डायवर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट’ होते. त्यामुळे पोर्टफोलिओच्या परताव्याची चंचलता (व्होलॅटिलिटी) कमी होते व स्थैर्य वाढते. एकूण गुंतवणूक प्रकार म्हणजे अ‍ॅसेट क्लासेस कोणते आहेत हे बघू या.

गुंतवणुकीचे प्रकार (अ‍ॅसेट क्लास)
अ. निश्चित उत्पन्न देणारे (मुदत ठेवी) : डेट प्रकार
ब. समभाग (शेअर्स) : इक्विटी प्रकार
क. स्थावर मालमत्ता (रियल इस्टेट)
ड. सोने/चांदी
याशिवाय काही अतिश्रीमंतांकडून पुराण वस्तू, घोडे, दुर्’ीळ वस्तू, पेंटिंग्ज या प्रकारातही गुंतवणूक केली जाते.पेंटिंग्ज या प्रकारातही गुंतवणूक केली जाते.
परतावा-जोखीम’
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही महत्त्वाच्या आहेत. पोर्टफोलिओमधून मिळणारा परतावा आणि त्याची जोखीम याचे सूत्र मार्कोविट्झ या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडले आहे. या सूत्रानुसार
पोर्टफोलिओवरचा एकूण परतावा म्हणजे त्यातील प्रत्येक अ‍ॅसेट प्रकाराच्या परताव्याचा आणि त्या प्रकाराचे एकूण पोर्टफोलिओ’ध्े जे प्रमाण आहे त्याच्या गुणाकाराची बेरीज. (एुशिलींशव ीर्शीीींप ेष र झेीींषेश्रळे ळी ुशळसहींशव र्रींशीरसश ेष ींहश ळपवर्ळींळर्वीरश्र रीीशीं’ी ीर्शीीींपी.)
अ‍ॅसेट प्रकारांचे प्रमाण (वेटेज), त्यांची प्रत्येकाची जोखीम (स्टँडर्ड डेविएशन) आणि त्यांच्या परताव्यांचा परस्परसंबंध (कोरिलेशन ऑफ रिटर्न्स) यांच्या गणिती सूत्रातल्या एकत्रिकरणाने पोर्टफोलिओची जोखीम (रिस्क) ठरवता येते.’
पोर्टफोलिओवरचा परतावा आणि त्यासाठी किती जोखीम घ्यावी लागली आहे यांचा एकत्रित विचार करायला पाहिजे. फ्नत जास्त परतावा मिळतोय हे पुरेसे नाही. पोर्टफोलिओची रचना अशी करायला पाहिजे की एकूण परतावा वाढेल आणि जोखीमही कमी होईल.
चार अ‍ॅसेट प्रकारांचा समावेश असलेला या एका नमुना पोर्टफोलिओवरचा परतावा असा काढला जातो.

अ‍ॅसेट प्रकार पोर्टफोलिओतले प्रमाण परतावा एकूण परतावा
डेट (मुदत ठेवी) 30% 8% 2.4%30% 8% 2.4%30% 8% 2.4%
इक्विटी (शेअर्स) 45% 20% 9%45% 20% 9%45% 20% 9%
स्थावर मालमत्ता 15% 10% 1.5%15% 10% 1.5%15% 10% 1.5%
सोने 10% -10% -1.0%10% -10% -1.0%10% -10% -1.0%
एकूण 100% 11.9%100% 11.9%100% 11.9%

गुंतवणुकीवरचा परतावा कशावर अवलंबून असतो?
या घटकांवर परतावा अवलंबून असतो.
कुठल्या अ‍ॅसेट प्रकारात गुंतवणूक केली ते (उहेळलश ेष ईीशीं उश्ररीी)
त्या प्रकारातील प्रत्यक्ष गुंतवणुकीची निवड (डशर्लीीळीूं डशश्रशलींळेप)
गुंतवणुकीची समय अचूकता (चरीज्ञशीं ढळाळपस)
दीर्घकाळात ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ हा परतावा ठरवणारा सर्वात मोठा घटक आहे याबाबत एकमत आहे. पण आपण प्रत्यक्षात बघतो की बहुधा यातल्या समय अचूकता व सिक्युरिटीची निवड यालाच जास्त महत्त्व दिले जाते. ते न करता अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनला सर्वात जास्त मह्त्त्व दिले पाहिजे.
चार अ‍ॅसेट प्रकारांमधील उपप्रकार कोणते ते पुढे दिले आहे.

निश्चित उत्पन्न देणारे प्रकार (डेट) इक्विटी स्थावर ’ाल’त्ता क’ॉडिटीज
ुदत ठेव • कंपनंचे शेअर्स
घर • सोने, चांदी
पोस्टाच ोजना :
इक्विटी म्च्ुअल ’ंड्स
दुकान • गोल्ड ईटीए’
डेट म्युच्युअल फंड • डेरिवेटिव्ह्ज • ऑि’स • गोल्ड म्ुच्ुअल ’ंड   •  कंपनंचे कर्जरोखे
ज’ीन/ प्लॉट • सिल्वर ईटीएफ
पीपीए’, रिझर्व्ह  बँक
बाँड्स इतदी
शेत

यातल्या प्रत्येक प्रकारावरचा परतावा आणि जोखीमही वेगवेगळी आहे. यापैकी तुम्ही कशात आणि किती पैसे गुंतवायचे ते तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी किती अवसर देऊ शकता आणि किती जोखीम घेऊ शकता त्यावर अवलंबून असते.
सोयीसाठी फ्नत डेट आणि इक्विटी या दोनच अ‍ॅसेट प्रकारांचा विचार केला तर  अल्पकालीन (तीन वर्षांपर्यंत) उद्दिष्टांकरता ‘डेट’ (ठेव) प्रकारातील गुंतवणूक योग्य असते कारण त्या’ध्े जोखीम कमी असते म्हणून मुदती’ध्े रक्कम मिळेल. आणि मध्यम (4 ते 10 वर्षे) आणि दीर्घकालीन (दहा वर्षांहून अधिक) उद्दिष्टे आहेत त्यांच्याकरता इक्विटी प्रकार योग्य आहे. मुदत जास्त असल्याने त्यावर जोखीम घेता येते. वर्षे) आणि दीर्घकालीन (दहा वर्षांहून अधिक) उद्दिष्टे आहेत त्यांच्याकरता इक्विटी प्रकार योग्य आहे. मुदत जास्त असल्याने त्यावर जोखीम घेता येते.

पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन - (Rebalancing)
जर तुम्ही इक्विटी 70% आणि डेट 30% असे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन ठरवले की त्याप्रमाणे तुम्ही त्यातले उपप्रकार घेऊन तुमचा पोर्टफोलिओ तयार करता येतो. तो केल्यानंतर बदलत्या बाजारभावामुळे अशा पोर्टफोलिओतले डेट-इक्विटीचे प्रमाण म्हणजेच अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन बदलते. तुमची पुढची पायरी म्हणजे हे प्रमाण स्थिर ठेवणे.  त्याकरता पुुनर्संतुलन (पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग) करण्याची गरज असते. ते कसे होते हे या उदाहरणात दिसेल. असे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन ठरवले की त्याप्रमाणे तुम्ही त्यातले उपप्रकार घेऊन तुमचा पोर्टफोलिओ तयार करता येतो. तो केल्यानंतर बदलत्या बाजारभावामुळे अशा पोर्टफोलिओतले डेट-इक्विटीचे प्रमाण म्हणजेच अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन बदलते. तुमची पुढची पायरी म्हणजे हे प्रमाण स्थिर ठेवणे.  त्याकरता पुुनर्संतुलन (पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग) करण्याची गरज असते. ते कसे होते हे या उदाहरणात दिसेल.

अ‍ॅसेट प्रकार सुरवातीला ठरवलेले प्रमाण 1 वर्षानंतरचे प्रत्यक्षातले प्रमाण पुनर्संतुलन करण्यासाठी वर्षानंतरचे प्रत्यक्षातले प्रमाण पुनर्संतुलन करण्यासाठी
डेट 30% 15% +15% (खरेदी)खरेदी)
इक्विटी 70% 85% -15% (विक‘ी)विक‘ी)
एकूण 100% 100% 0%100% 100% 0%100% 100% 0%

अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन आणि पोर्ट’ोलिओ रिबॅलन्सिंग केल्यानंतर खरेदी,  विक्री (सेल) किंवा जैसे थे  म्हणजे बाय/सेल/होल्ड असे निर्णय घेणे तुम्हांला सोपे जाते, कारण वस्तुनिष्ठता (ऑब्जेक्टिव्हिटी) आल्यामुळे भावनाप्रधानता कमी होते. तुमचे लक्ष ‘बाजारावर मात करणे’ याकडे न राहता तुमची उद्दिष्टे पूर्ण करणे याकडे राहते. यामुळे मानसिक त्रासही कमी होतो. ‘आता घेऊ का विक‘ी करू, याची उत्तरे तुम्हाला या सूत्राकडे बघूनच मिळतात. इतरांना न विचारता हे तुम्ही ठरवू शकता.याची उत्तरे तुम्हाला या सूत्राकडे बघूनच मिळतात. इतरांना न विचारता हे तुम्ही ठरवू शकता.
बदललेले अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन मूळ प्रमाणात आणून ठेवण्याचे फायदे काय आहेत ?
अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन हे तुमची उद्दिष्टे पूर्ण करायला म्हणून केलेले असते. ते जर नंतर बदलले तर तुमची उद्दिष्टपूर्ती न व्हायची शक्यता असते. दुसरे म्हणजे, अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन संभा़ळल्याने ‘कमी दरा’ध्े खरेदी आणि चढ्या दरात विक्री ’ हे फायदा कमवायचे सनातन सूत्र प्रत्यक्षात येते. या उदाहरणातच बघा ना. इथे इक्विटी प्रकारात फायदा झाल्याने त्याची विक‘ी आणि कमी फायद्यातल्या डेट प्रकाराची खरेदी झाली. परंतु प्रमाण वाढलेल्या प्रकाराची विक‘ी व प्रमाण कमी असलेल्या प्रकाराची अधिक खरेदी हे तत्त्व सांगायला सोपे असते प्रत्यक्षात आणणे कठिण आहे. कारण प्रत्येक वेळी प्रवाहाविरुद्ध पोहोण्यासारखे आहे. जेव्हा शेअर्सचे दर वाढायला लागतात तेव्हा अजून वाढण्याची अपेक्षा असते आणि अशा वेळी खरेदीऐवजी विक‘ीचा निर्णय घेणे कठीण असते. त्याउलट मागणी कमी असते तेव्हा त्याचे भाव कमी होत असतात आणि त्याची खरेदी करायचा निर्णयही अवघडच असतो. कारण तेव्हा भाव अजून खाली येतील असे वाटत असते.अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन संभा़ळल्याने ‘कमी दरा’त  खरेदी आणि चढ्या दरात विक‘ी’ हे फायदा कमवायचे सनातन सूत्र प्रत्यक्षात येते. या उदाहरणातच बघा ना. इथे इक्विटी प्रकारात फायदा झाल्याने त्याची विक‘ी आणि कमी फायद्यातल्या डेट प्रकाराची खरेदी झाली. परंतु प्रमाण वाढलेल्या प्रकाराची विक‘ी व प्रमाण कमी असलेल्या प्रकाराची अधिक खरेदी हे तत्त्व सांगायला सोपे असते प्रत्यक्षात आणणे कठिण आहे. कारण प्रत्येक वेळी प्रवाहाविरुद्ध पोहोण्यासारखे आहे. जेव्हा शेअर्सचे दर वाढायला लागतात तेव्हा अजून वाढण्याची अपेक्षा असते आणि अशा वेळी खरेदीऐवजी विक्रीचा  निर्णय घेणे कठीण असते. त्याउलट मागणी कमी असते तेव्हा त्याचे भाव कमी होत असतात आणि त्याची खरेदी करायचा निर्णयही अवघडच असतो. कारण तेव्हा भाव अजून खाली येतील असे वाटत असते.

शेअर बाजार वरखाली जातो तर रोजच असे रिबॅलन्सिंग करायला लागते का???
नाही. तसे करायची गरज नसते कारण एक्झिट लोड आणि प्राप्तिकर दोन्ही द्यावे लागेल. त्यामुळे पुनर्संतुलनाचा निर्णय दोन पद्धतीने घेता येतो :
ठरावीक कालावधीनंतर म्हणजे दर 6/12 महिन्यांनी असे ठरवून आणि/किंवा
अ‍ॅसेट प्रकारांच्या मूळ प्रमाणात किती फरक पडला आहे त्यावरून. म्हणजे 10%/15% पेक्षा अधिक फरक पडला तर.


असे बॅलन्सिंग करणार्‍या म्युच्युअल फंड योजना आहेत , ज्यांचा विचार पुढील भागात करणार आहोत.                  
कुठले अ‍ॅसेट प्रकार निवडायचे???
पुढील तक्त्यात एप्रिल 1980 ते मार्च 2022 ा कालावधीतले अ‍ॅसेट प्रकारांचे तुलनात्मक परतावे दाखवले आहेत. ा कालावधीतले अ‍ॅसेट प्रकारांचे तुलनात्मक परतावे दाखवले आहेत.

अ‍ॅसेट प्रकार परतावा %
मुदत ठेवी(डेट) 8.08.08.0
सोने 8.98.98.9
सेन्सेक्स (इव्किटी) 15.715.715.7
महागाई वाढ 7.67.67.6

यावरून असे दिसते की सेन्सेक्सचे म्हणजे इक्विटी या अ‍ॅसेट प्रकाराचे रिटर्न्स सगळ्यात जास्त आहेत.  महागाईवर मात करायला इक्विटीच सर्वात योग्य आहे असे दिसतेय. सोन्या’ध्ेसुद्धा वाढ आहे, पण महागाईवाढीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळेच सर्व प्रकारांची तुलना करून योग्य असलेला अ‍ॅसेट प्रकार घ्यावा.पण महागाईवाढीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळेच सर्व प्रकारांची तुलना करून योग्य असलेला अ‍ॅसेट प्रकार घ्यावा.
अ‍ॅसेट प्रकारांची तुलना

अ‍ॅसेट प्रकार फायदा मर्यादा
डेट (ठेव) • मुद्दलाची सुरक्षितता
निश्चित उत्पन्न मिळते.
रक्कम मुदतीपूर्वी काढता येते.* • महागाईदरापेक्षा जास्त परतावा देण्याची
क्षमता कमी
व्याजावर प्राप्तिकर भरावा लागतो*
सुरक्षित ठेवींवर व्याजदर कमी
इक्विटी प्रकार • आकर्षक वाढीची शक्यता
नियमित उत्पन्न मिळते
महागाईवाढीपेक्षा जास्त परतावा
प्राप्तिकर सवलती आहेत.
तरलता आहे.
पाहिजे तेवढे विकू शकतो. • किंमती’ध्े चंचलता असते.
परताव्याची किंवा मुद्दलाची खातरी नाही
विकत घेण्यापूर्वी अभ्यासाची गरज
नियमितपणे आढावा घेणे आवश्यक
सोने • स्थिर किमतीचा फायदा
तरलता- विक‘ी करता येते.
आर्थिक आधार म्हणून उपयोगी • नियमित उत्पन्न नाही.
विक‘ीवर प्राप्तिकर भरावा लागतो.
सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था जरुरीची
महागाईदरापेक्षा जास्त परतावा देण्याची
क्षमता कमी
स्थावर
मालमत्ता • आकर्षक वाढीची शक्यता
नियमित उत्पन्न मिळते
घरभाडे). • स्थानिक बाबींवर वाढ अवलंबून असते.
भाडे ठेवीवरच्या व्याजापेक्षा कमी मिळते.
खरेदीच्या वेळी/भाड्याने देताना जोखीम
असते.
अ‍ॅसेट प्रकार फायदा मर्यादा
महागाईवाढीपेक्षा जास्त परतावा
देण्याची क्षमता आहे. • मालमत्तेची देखभाल करावी लागते.
तुकडा विकता येत नाही.
विक‘ीनंतर प्राप्तिकर भरावा लागतो किंवा
कमी व्याजदराचे रोखे घ्यावे लागतात  
किंवा ’ाल’त्ता खरेदी करावी लागते.


अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ करून पोर्टफोलिओ तयार करताना गुंतवणुकीतून तुमची उद्दिष्टे साध्य होतील अशा अ‍ॅसेट प्रकारांची निवड केली पाहिजे. कारण दीर्घकाळात अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन हा गुंतवणुकीवरचा परतावा ठरवणारा सर्वात मह्त्त्वपूर्ण घटक असतो. 
अ‍ॅसेट प्रकारांवरचा) मागील काळातला फ्नत परतावा किती मिळाला हे न बघता त्यातली जोखीम किती आहे हे बघणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
ही सर्व तत्त्वे लक्षात ठेऊन आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपला पोर्टफोलिओ तयार करू शकतो.


Arvind Paranjape

Arvind Paranjape