तब भी बोला ..
तबला या वाद्याची उत्पत्ती कधी आणि कशी झाली या विषयी मतभेद आहेत. पण त्याविषयीची एक मनोरंजक कथा आहे. काही शतकापूर्वी एका राजाच्या दरबारात दोन पखवाज वादकांच्या स्पर्धेत एक वादक पराभूत झाल्यावर त्याने रागाने आपला पखवाज खाली आपटला आणि त्याचे दोन तुकडे झाले. दोन्ही तुकड्यातून आवाज येऊ लागल्यावर तो
आश्चर्यचकित झाला. हर्षभरीत होऊन तो ओरडला"नीचे गीरा, टुटा, तब भी बोला .. वो तबला "
ही कथा कल्पित असली तरी एक नक्की आहे की जगातील सर्वात प्रगल्भ असलेल्या या तबला वाद्याने पखावाजाची भाषा घेतली आहे. सर्व संगीत प्रकारांना समर्थपणे साथ करू शकणार्या आणि एकल कार्यक्रम ही पेश करू शकणार्या या वाद्याची सप्रयोग ओळख करून देणारा हा कार्यक्रम " तब भी बोला"
भारतात आणि भारताबाहेर अनेक ठिकाणी मी हा कार्यक्रम सादर केला आहे. मानवी जीवनातच लय-ताल असल्याने सर्वांनाच हा कार्यक्रम भावतो यात आश्चर्य नाही. गायक आणि हार्मोनियमचा लेहरा यांची साथ घेऊन हा कार्यक्रम दोन भागात सादर होतो. पहिल्या भागात तबला हे साथ संगतीचे वाद्य असा परिचय करून दिल्यानंतर तबला एकल वाद्य कसे आहे याचे प्रात्यक्षिक होते. हा साधारण एक ते दीड तासांचा कार्यक्रम असतो.
पूर्वी सादर केलेल्या कार्यक्रमाची झलक या व्हिडिओ वरून मिळू शकेल.