Menu

Arvind Paranjape

Author of books on Investment

योजनेची निवड महत्त्वाची असते

 

म्युच्युअल फंड योजनेची निवड

स्वत: अभ्यास करून शेअर्स घेणे हे सोपे नसते हे सूज्ञ गुंतवणुकदारांच्या लक्षात आले आहे. कारण शेअरच्या किंमतीवर अनेक घटक परिणाम करत असतात ज्यांचा वेध घेणे ही सामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेरील बाब आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनेचा सोयीचा आणि लाभदायी पर्याय सामान्य गुंतवणुकदारांसमोर आलेला आहे. पण त्याकरताही अभ्यासाची गरज आहेच. कारण सध्याच्या शेअर बाजारात मूठभर कंपन्यांचेच भाव वर जाताना दिसत आहेत. 30 पैकी अगदी 8-10 अशा थोड्याच  शेअर्समधील वाढीचा परिणाम म्हनून बीएसई सेन्सेक्स निर्देशांक वरती  जाऊ शकतो.  तसेच शेअरबाजारातील 3000 कंपन्यांपैकी 50 पेक्षा कमी कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे योग्य कंपनीचे शेअर्स असले तरच फायदा होतो. आणि ही बाब म्युच्युअल फंड योजनांच्या गेल्या 2 वर्षांमधील कामगिरीवरूनही स्पष्ट होताना दिसते आहे. योग्य योजनेची निवड करायला सेबीने 2018 मध्ये योजनांच्या वर्गवारीचे निकष निश्चित केले होते. त्यामुळे आता एका प्रकारच्या योजनांची तुलना करणे शक्य झाले आहे.

पुढील तक्यामध्ये 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीचा तपशील दिला आहे. त्यावर नजर टाकली असता असे दिसून येते की  कमाल आणि किमान परतावा देणार्‍या योजनांमधील फरक लक्षणीय आहे. गुंतवणुकदारांच्या दृष्टीने म्युच्युअल फंड योजनांची निवड किती महत्त्वाची आहे हे यातून अधोरेखित होते.

 

योजनेचा प्रकार

योजनांची संख्या

सरासरी परतावा 1 वर्ष

निर्देशांक

परतावा 1 वर्ष

1 वर्षाचा परतावा %

2 वर्षाचा परतावा %

 

 

 

 

कमाल

किमान

फरक

कमाल

किमान

फरक

लार्ज कॅप

27

-14%

-17%

-4 %

-27%

23%

1%

-12%

13%

लार्ज + मिड कॅप

20

-17%

-17%

-9%

-27%

18%

-5%

-17%

12%

मल्टी कॅप

29

-14%

-12%

-5%

-17%

12%

0%

-12%

12%

मिड कॅप

22

-18%

-23%

-10%

-26%

16%

10%

-8%

18%

स्मॉल  कॅप

13

-25%

-36%

-14%

-35%

21%

-14%

-28%

14%

इएलएसएस

32

-10%

-8%

-0%

-26%

26%

-2%

-20%

18%

फोकस्ड  

15

-8%

-7%

-3%

-16%

13%

0%

-17%

17%

बॅलेन्स्ड

25

-12%

-8%

0%

-27%

27%

2%

-18%

20%

 

(सूचना: मागील कामगिरी परत होईल अशी खात्री नाही.)

अर्थातच महत्त्वाची बाब म्हणजे कुठली योजना सर्वोच्च परतावा देईल हे आधी कोणालाही सांगता येत नाही. तसेच मागील काळात उत्तम कामगिरी आहे म्हणून पुढेही होईल असेही सांगता येत नाही. फंड मॅनेजर्स कडून शेअर्सची निवड जशी होते त्याप्रमाणे त्या योजनेवर परतावा मिळतो. त्यामुळे हा मुद्दा आता अधिक स्प्ष्ट ःहोऊ लागला आहे की योजनेची निवड चुकली तर दीर्घ काळात आणि/किंवा मोठ्या रकमेवरती जास्त नुकसान होऊ शकते. केवळ मागील कामगिरी न बघता योजना निवडताना इतरही काही बाबी विचारात घ्याव्या लागतात, ज्यापैकी काही महत्त्वाच्या बाबी पुढे दिल्या आहेत.

1.           म्युच्युअल फंड कंपनीची एकूण कामगिरी व त्यांचे व्यवस्थापन

2.           म्युच्युअल फंड  राबवत असलेली शेअर्सची निवड करण्याची आणि जोखीम व्यवस्थापनाची प्रकि‘या

3.           योजनेच्या फंड मॅनेजरची मागील कामगिरी

4.           निर्देशांकाच्या आणि श्रेणीतील योजनांच्या सरासरी च्या तुलनेत योजनेची कामगिरी 

5.           योजनेच्या परताव्यातील सातत्य

6.           योजनेच्या पोर्टफोलिओतील कॉन्सट्रेशन

 

या पद्धतीने जरी निवड केली असेल तरीही वर्षातून किमान 1 दा तरी योजनांचा आढावा घेतला पाहिजे आणि त्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. 

 

*****

बॅलन्स्ड फंड्‌स: नियमित उत्पन्नाच्या समतोल योजना

बॅलन्स्ड फंड्‌स: नियमित उत्पन्नाच्या समतोल योजना

Paranjape article

-अरविंद परांजपे

गेल्या काही काळात बॅंकांचे व्याजदर कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना आता आपले पुढे कसे भागणार आणि आता कशात गुंतवणूक करावी, असा रास्त प्रश्‍न पडला आहे. जसजशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते, तसेतसे व्याजदर कमी होतात, असे प्रगत देशांकडे पाहिले की लक्षात येते. देशातील महागाईवाढीच्या दराशी व्याजदर निगडित असतात. आपल्या देशात सध्या 10 वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर एक वर्षापूर्वी असलेले 8 टक्के व्याज आता 7.2 टक्के एवढे कमी झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी रेपो दरात कपात करुन कमी व्याजदरांचे धोरणच राबविले जाईल, असे दिसते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात आणि नियमित उत्पन्नासाठी इक्विटी जास्त असलेल्या बॅलन्स्ड फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. निवृत्तीच्या काळात खरे उत्पन्न (मिळणारे व्याज-महागाई दर) वाढविण्यासाठी बॅलन्स्ड योजनेतून "सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान'चा (एसडब्ल्यूपी) चांगला उपयोग होईल. मात्र, त्यासाठी भांडवलात तात्पुरती घट झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता हवी. याशिवाय बॅलन्स्ड योजनांचे इतरही फायदे आहेतच. ते पुढीलप्रमाणे-1) एकाच योजनेतून डेट (कर्जरोखे) आणि इक्विटी (शेअर्स) योजनेचे फायदे (म्हणजे स्थिरता आणि वृद्धी) मिळू शकतात. जास्त योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही, 2) नियोजित "ऍसेट ऍलोकेशन' कायम ठेवण्यासाठी दरमहा "रिबॅलन्सिंग' करीत असल्याने गुंतवणूकदाराला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही. डेट व इक्विटी भागाच्या विक्रीवर "एक्‍झिट लोड' पण द्यावा लागत नाही, 3) नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरतात, 4) "रिबॅलन्सिंग'साठी जेव्हा डेट किंवा इक्विटी भागाची विक्री होते, त्यावरील अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर हा गुंतवणूकदाराला द्यावा लागत नाही. (एरवी त्याला तो स्वत:ला भरावा लागला असता.)

बॅलन्स्ड फंडात खुल्या आणि बंद अशा दोन्ही प्रकारच्या योजना असतात आणि या दोन्ही प्रकारांमध्ये इक्विटी किंवा डेट प्रकार जास्त असणाऱ्या योजना असतात. डेट प्रकार जास्त (70 टक्‍क्‍यांपेक्षा) असणाऱ्या खुल्या योजनांना "एमआयपी' असे म्हटले जाते. यात साधारणपणे 15 ते 30 टक्के इक्विटी आणि उर्वरित डेट असतात. यामुळे यातील जोखीम कमी असते; पण परतावाही इक्विटी आधारित बॅलन्स्ड योजनांपेक्षा कमी असतो. त्यामुळे अधिक परताव्यासाठी इक्विटीचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांची निवड करावी. एकरकमी किंवा "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान'द्वारे (एसआयपी) ठराविक रक्कम बॅलन्स्ड फंड योजनेत जमा करून त्यातून निवृत्तीच्या काळात रक्कम काढून घेता येते, ज्याला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) म्हणतात. मासिक लाभांश घेण्याचाही पर्याय असतो, पण ती रक्कम बाजारावर अवलंबून असल्याने त्यात अनिश्‍चितता आहे. त्यापेक्षा निश्‍चित रकमेचा एसडब्ल्यूपी जास्त उपयोगी ठरेल. दरमहा किती रक्कम काढावी, हे गुंतवणूकदाराने ठरवायचे असते. (पूर्वीची कामगिरी बघता साधारणपणे वार्षिक 10 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढणे सहजशक्‍य आहे.)

बहुतेक सर्वच म्युच्युअल फंड कंपन्यांच्या बॅलन्स्ड प्रकारातील योजना उपलब्ध असल्याने निवडीला खूप वाव आहे. सोबतच्या तक्‍त्यामध्ये महत्त्वाच्या आणि चांगली कामगिरी केलेल्या काही योजनांमधून 31 मार्च 2016 या दिवसापर्यंत, रु. 5 लाख या मूळ रकमेतून, 5 आणि 10 वर्षांचा "एसडब्ल्यूपी' केला असता तर कसे चित्र दिसले असते, याची माहिती दिली आहे.

सोबतच्या तक्‍त्यावरून असे दिसते, की 5 किंवा 10 वर्षांच्या कालावधीत मूळ गुंतवणुकीवर 9 टक्के दराने करमुक्त (म्हणजे 30 टक्के करदात्यांना 12.8 टक्के करपात्र) रक्कम काढली गेली आणि एकूण रकमेत वृद्धीही झाली आहे; तसेच बाजारभावात घट झाल्यामुळे 5 किंवा 10 वर्षांच्या मुदतीत जरी काही वेळा मूळ रक्कम 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी झाली असली तरी कालांतराने बाजार वर गेल्यानंतर याआधी झालेला तोटा भरुन निघाला आहे. बॅंकेत जशी मुदलाची आणि व्याजाची हमी दिली जाते, तशी म्युच्युअल फंडाकडून जरी मिळत नसली, तरीसुद्धा करमुक्त आणि बॅंकेपेक्षा अधिक परतावा मिळण्यासाठी बॅलन्स्ड योजनांचा विचार केला पाहिजे.
(डिस्क्‍लेमर ः लेखक ज्येष्ठ म्युच्युअल फंड सल्लागार आहेत. शेअर बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजनांमधील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Think before you buy that piece of property...

Obsession with Real Estate Investing

“No asset class or investment has the birth right of a high return. An asset is only attractive if it’s priced right.”
― Howard Marks

Last week, Ketan, a non resident investor from Gulf country came to me to for advice on investing. As per my practice, before suggesting him anything I got information of his existing investment and objective for new investment.  When I prepared his investment kundali (pie chart), it showed that he was having 71% of his assets in real estate. (3 flats excluding the residential house).  

Read more

Close Ended Equity funds

Every investor attempts to “buy low and sell high” in the share market to make a profit. However, the continuously rising share market is not giving much opportunity to invest. BSE senesex was 21000 in Jan 2008. After the market got the hint of the NDA’s victory, it is continuously rising and making new highs every day.

Read more